अज्ञात वाहनाच्या धडकेत वाढदिवशीच तरूणाचा दुदैवी मृत्यू

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील कोरपावली गावातील तरुणाचा वाढदिवसाच्या दिवशीच जळगाव-भुसावळ महामार्गावरील रस्त्यावर झालेल्या मोटरसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात दुदैवी मृत्यु झाला असून त्यांचा मित्र गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे कोरपावली परिसरात शोककळा पसरली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, राहुल संतोष सोनवणे (वय २१ वर्ष) व दिपक उर्फ देवेन्द्र दत्तु तायडे (वय २३ वर्ष) हे दोन्ही मित्र दिनांक ११ नोव्हेंबर रोजी रात्री १o ते १२ वाजेच्या दरम्यान शाहीन कंपनीच्या मोटरसायकल (क्र. एमएच १९ ईएल ४०९७) या दुचाकी वाहनाने भुसावळकडून जळगावकडे जात असतांना महामार्गावरील गोदावरी हॉस्पीटल जवळ असलेल्या एका ढाब्या जवळ एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात राहुल सोनवणे यांचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्या सोबत असलेला हा गंभीर जखमी झाला आहे. त्यास उपचारासाठी गोदावरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर घटनेचे वृत्त कळताच कोरपावली गाव व परिसरात सर्वत्र एकच शोककळा पसरली .

Protected Content