छत्रपती संभाजीनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यभरातील महिलांमध्ये सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची चर्चा आहे. लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचा पहिला हफ्ता ३ हजार रुपये जमा झाले आहेत. या योजनेचे पैसे आणण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मिळालेली माहितीनुसार अशी की, पाचोड शिवाजीनगर भागात राहणाऱ्या पार्वती जनार्दन बनसोडे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला होता. त्यांचे छत्रपती संभाजीनगर येथील बँक ऑफ बडोदा येथे तीन हजार रुपये जमा झाले होते. हे पैसे त्या त्यांचा मुलगा निखीलसोबत जामखेड शिवारात आल्या होत्या. त्यावेळी पार्वती यांना चक्कर आली आणि त्या मोटारसायकवरुन खाली डोक्यावर पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या.
त्यांना तातडीनं पाचोड ग्रामीण हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. घाटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्यांना मृत म्हणून घोषित केलं. या घटनेमुळे पाचोड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पार्वती बनसोडे यांच्या पश्चात पती आणि दोन मुलं असा परिवार आहे.