घरकुलचे आरोपी नाशिक कारागृहात रवाना

gharkul inmates ghule

धुळे प्रतिनिधी । घरकूल प्रकरणी शिक्षा झालेल्या सर्व आरोपींना नाशिक येथील कारागृहात हलविण्यात आले असून याप्रसंगी तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, घरकूल प्रकरणी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी निकाल लागून यात माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह अन्य ४८ आरोपींना शिक्षेसह दंड ठोठावण्यात आला. आरोपींमध्ये माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यादेखील समावेश आहे. यातील काही महिलांना जामीन मिळाला असून अन्य आरोपी धुळे कारागृह तर दहा जण रूग्णालयात उपचार घेत आहेत. दरम्यान, आज सकाळी साडेअकराच्या सुमारास या सर्व आरोपींना नाशिक येथील कारागृहात हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. कागदपत्रांती पूर्तता करून लवकर या सर्व आरोपींना नाशिक येथील कारागृहात हलविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. तर रूग्णालयातील आरोपींना नाशिक येथील रूग्णालयात ठेवणार की ते धुळे रूग्णालयातच उपचार घेणार याची माहिती मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नाही.

दरम्यान, घरकूलच्या आरोपींना नाशिक येथे हलविण्याप्रसंगी कारागृहाच्या परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. बर्‍याच आरोपींचे कुटुंबिय अथवा समर्थक याप्रसंगी उपस्थित असल्याचे दिसून आले.

Protected Content