जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | छत्रपती शिवाजीनगर भागातील हुडको परिसरात गुरुवारी २० फेब्रुवारी संध्याकाळी सायंकाळी ७ वाजता पाण्याच्या मोटारीतून झालेल्या विद्युत धक्क्याने १४ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मृत मुलीचे नाव सोनल सुरेश बाविस्कर (वय १४, रा. शिवाजीनगर, हुडको, जळगाव) असे आहे. ती आपल्या वडील, आजी-आजोबा, लहान भाऊ आणि बहिणीसह राहत होती. गुरुवारी (२० फेब्रुवारी) संध्याकाळी सायंकाळी ७ वाजता सातच्या सुमारास घरात पाणी आले होते, त्यामुळे मोटार चालू करण्यात आली.
दरम्यान, सोनलने मोटारीला हात लावताच तिला जोरदार विद्युत धक्का बसला आणि काही क्षणांतच ती बेशुद्ध पडली. हा प्रकार पाहताच परिसरातील नागरिकांनी तातडीने तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले.
या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली आहे. रुग्णालयात मुलीच्या अचानक मृत्यूमुळे आई-वडिलांसह संपूर्ण कुटुंबीय हंबरडा फोडत होते. शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी आणि नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. सदर घटनेची अधिक चौकशी सुरू असून, जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.