मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | राज्यसभेच्या निवडणूक मतदानासाठी राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला, यावर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या अर्जावरील निर्णय अनपेक्षित असून त्यांच्या मतदानाचा हक्कच नाकारला असल्याचे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.
राष्ट्र्वादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि मंत्री मलिक इडीने केलेल्या कारवाईमुळे अटकेत आहेत. त्यांनी राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी एक दिवसाचा जामीनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. यावर आरोप सिद्ध झालेले नसतानाही त्यांना मतदान अधिकार नाकारणे हि संविधानाची पायमल्ली आहे. लोकशाहीत मताधिकाराला महत्व आहे. देशमुख आणि मलिक यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा असून उद्या भाजपला पळता भुई होणार आहे. मतदानासाठी काही तसाच शिल्लक असल्याचे ट्वीट करीत म्हटले आहे.
तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील, लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेल्या मलिक आणि देशमुख यांना मतदान करता येईल अशी अपेक्षा होती. परंतु आणि कोणतीही गुन्हा सिद्ध झालेला नसताना मतदानाचा अधिकार नाकारले जाणे हा अन्याय असून न्यायालयाच्या या निर्णयामुळे निराशा झाली असून यावर भाष्य करणार नसल्याचेहि त्यांनी म्हटले आहे.