
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आपल्या नातेवाईकांसोबत जनता एक्सप्रेसने पटना येथे निघालेल्या ७२ वर्षीय वृद्धाची अचानक तब्येत बिघडल्याने गुरुवारी ३० जानेवारी रोजी रात्री १० वाजता त्यांना जळगाव रेल्वेस्थानकावर उतरून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, त्याच्यावर उपचार सुरू असताना रात्री ११ वाजता मृत्यू झाला आहे. या संदर्भात जळगाव रेल्वे पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सुरेंद्र सिंह मथुरा सिंह वय-७२, रा. गोपालपूर बिहार असे मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे.

पोलीस सूत्राने दिलेली माहिती अशी की, सुरेंद्रसिंह मथुरासिंह हे आपल्या कुटुंबासह मुंबई येथून पाटणाकडे जाण्यासाठी जनता एक्सप्रेस मध्ये गुरुवार ३० जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता बसले होते. रेल्वे प्रवास करत असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागल्याने तब्येत बिघडली. त्यामुळे त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाईकांनी त्यांना रात्री १० वाजता जळगाव येथील रेल्वेस्थानकावर उतरवून तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री ११ वाजता मृत्यू झाला आहे. या संदर्भात जळगाव रेल्वे पोलीस ठाण्यात अकस्मात पृथ्वीची नोंद करण्यात आली आहे.


