बेरोजगारीचा आकडा उच्चांकी पातळीवर

Berojgari 1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील बेरोजगारीचा दर एप्रिलच्या तीन आठवड्यांत 7.9 टक्क्यांवरून 8.0 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांतील हा बेरोजगारीचा उच्चांक आहे. सीएमआयई (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी)ने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.

 

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात असलेला बेरोजगारीचा दर 7.9 टक्क्यांवरून दुसऱ्या आठवड्यात 8.1 तर तिसऱ्या आठवड्यात 8.4 टक्के झाला आहे. केवळ तीन आठवड्यांतच हा दर 0.5 टक्क्यांनी वाढल्याने बेरोजगारी पुढील काळात मोठे रुप घेण्याची शक्यता आहे. इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार NSSO च्या सर्व्हेमध्ये 2017-18 या वर्षात पुरुष कामगारांची संख्या 28 कोटी 60 लाखवर आली आहे. या रिपोर्टमध्ये शहरी आणि ग्रामीण भागाची वेगवेगळी आकडेवारीही देण्यात आली आहे. दरम्यान, नोटबंदी आणि जीएसटीमुळे जवळपास 4 ते 5 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्याचा अहवाल नुकताच समोर आला होता. यावरून लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा मुद्दाच विरोधी पक्षांनी बनविला आहे.

Add Comment

Protected Content