पारोळा प्रतिनिधी । उंदिरखेडे (ता. पारोळा) येथे जल व मृदसंधारण विभागाच्या अंतर्गत स्थानिक स्तर निधीतून खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या भक्कम प्रयत्नातून साकारलेला बंधारा ओव्हर फ्लो झाला असून याचा परिसरातील जनतेला लाभ होणार आहे.
उंदिरखेडे (ता. पारोळा) येथे जल व मृदसंधारण विभागाच्या अंतर्गत स्थानिक स्तर निधीतून खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या भक्कम प्रयत्नातून साकारलेला बंधारा ओव्हर फ्लो झाला असून या दोन बंधारे मधून झुळझुळ वाहणारे पाणी शेतकर्यांच्या मनाला आनंद देत आहेत. या परिसरातील हजारो एकर शेतीला या पाण्याचा फायदा होणार असल्याने शेतकर्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. दोन कोटी रुपये खर्चाचे दोन बंधार्यांचे काम पूर्ण झाले असून यातून वाहणारे पाणी शेतकरी व परिसरातील ग्रामस्थांना आनंद देणारे ठरत आहे..
गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात बंधार्यांची मागणी होती खासदार उन्मेषदादा पाटील हे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या मदाधिक्याने निवडून आल्यानंतर तातडीने त्यांनी ऑगस्ट महिन्यामध्ये याबाबत बैठक घेऊन हा बंधारा मंजूर करून घेतला होता. या बंधार्याचे काम वेळेत पूर्ण झाल्याने यंदाच्या पावसाळ्यात हा बंधारा ओव्हर फ्लो झाला असून यातून वाहणारे पाणी हे परिसरातील बळीराजाला आनंद देणारे ठरले आहे.
ओसंडून वाहू लागले बंधारे
या परिसरात उंदीरखेडा गावात दोन बंधारे बांधण्यात आले असून यातून मोंढाळे, पिंपरी, तरडी, टोळी, उंदीरखेडे, मुंदाणे, देवगाव परिसरातील तीन ते चार हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असून या परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी आजच वाढली आहे.यामुळे या परिसरातील शेतकर्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
गावांचा प्राणी प्रश्न सुटला
या बंधार्याच्या कामाकरिता पारोळ्याचे लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पवार व परिसरातील ग्रामस्थांनी मागणी लावून धरली होती.खासदार उन्मेश दादा पाटील यांनी एकूण बंधारा मंजूर करून घेतला होता. खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नातून उंदीरखेडा एक व उंदीरखेडा दोन, दरेगाव, बेलदारवाडी, भामरे, भोरस टाकळी प्र.दे., उंबरखेडे, वरखेडे, देवळी, रामनगर, मांदुरने, सायगाव, पिंपळवाड म्हाळसा अशी सोळा बंधारे पहिल्या टप्प्यात पूर्ण होत असून दुसर्या टप्प्यात तामसवाडी, महाळपुर, पुनगाव, पिंपळवाड म्हाळसा, सायगाव ,बहाळ, नेरी, दुसखेडा ,संगमेश्वर, नाचणखेडा, टाकळी,पिंप्री प्र.भ.अशी सोळा बंधारे मंजूर झाले असून त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहेत. एकंदरीत बत्तीस बंधार्यामुळे पाचोरा, पारोळा, चाळीसगाव परिसरातील शेतकर्यांना सिंचनाचा मोठा फायदा होणार असून विहिरींच्या पाण्याची पातळी वाढणार असल्याने बारमाही पिके घेता येणार आहेत.