अमळनेर प्रतिनिधी । येथिल नगरपालिकेच्या विविध समिती सभापती निवडणूक आज बिनविरोध पार पडली.
नवनिर्वाचित सभापती पुढिल प्रमाणे : – बांधकाम – सुरेश आत्माराम पाटील, महिला बालकल्याण :- निशानबानो अनिसखा कुरेशी, सौ.नुतन महेश पाटील (उप सभापती) शिक्षण व क्रिडा :- सौ.रत्नमाला साखरलाल महाजन, आरोग्य व स्वच्छता :- सौ.राधाबाई संजय पारधी,पाणीपुरवठा :- राजेश शिवाजीराव पाटील व नियोजन व विकास समिती सभापती विनोद रामचंद्र लांबोळे (उप नगराध्यक्ष) तसेच स्थायी समिती सदस्य पदी विवेक भीमराव पाटील, प्रा.रामकृष्ण बापूराव पाटील व शेख सलीम टोपी यांची निवड आजच्या बैठकीत करण्यात आली.
पीठासन अधिकारी म्हणून काम पाहिलेल्या तहसिलदार प्रदिप पाटील ही निवड घोषित केली. निवड झालेल्या सर्व सभापतींचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ.पुष्पलताताई साहेबराव पाटील,माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील,आमदार सौ.स्मिताताई वाघ, भाजपा जिल्हाध्यक्ष उदयबापू वाघ, बहुजन समाज नेते रामभाऊ संदानशिव ,माजी नगराध्यक्ष विनोदभैय्या पाटील, विरोधी गटनेते प्रविण पाठक, मुख्याधिकारी सौ.शोभा बाविस्कर,शिवसेना नेते संजय कौतिक पाटिल,कॉग्रेस तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे,दारूल कब्जा मुस्लिम समाज अध्यक्ष फैयाद पठाण, भाजीपाला विक्रेता संघ अध्यक्ष प्रकाश महाजन ,म.न.से अध्यक्ष अधिकार पाटील, जेष्ठ नगरसेवक संजय मराठे, बिपीन पाटील,मनोज पाटील,प्रताप शिंपी,नरेंद्र संदानशिव ,शेखा हाजी मिस्त्री आदीसह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.