Home क्राईम उमर्टी प्रकरण : कशी झाली घटना, कोण झाले जखमी?; जाणून घ्या घटनेचा...

उमर्टी प्रकरण : कशी झाली घटना, कोण झाले जखमी?; जाणून घ्या घटनेचा सिनेस्टाईल थरार !


चोपडा/जळगाव-पी.आर.माळी । मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र सीमेदरम्यानच्या पार उमर्टी गावात गावठी कट्टा विक्री करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक केल्यानंतर गावातील जमावाने पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या पथकावर जीव घेणे हल्ला करण्यात आला होता. यामध्ये एक सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्यासह पोलीस कर्मचारी, होमगार्ड असे एकुण ४ जण जखमी झाले होते. तर एका पोलीस कर्मचाऱ्यांचे अपहरण करून दाबून ठेवण्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी १५ फेब्रुवारी रोजी ६ ते ९ वाजेच्या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणा एका गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.

अशी आहे घटना
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर माहिती मिळाली की, चोपडा तालुक्यातील पार उमर्टी येथे अवैधरित्या गावठी (कट्टा) पिस्तूल विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे यांच्यासह पोलीस नाईक शशिकांत पारधी, पोलीस कॉन्स्टेबल दीपक शिंदे, चेतन महाजन, विशाल पाटील, किरण पारधी, होमगार्ड किशोर पवार, होमगार्ड रोशन बाविस्कर, विश्वास भील असे पथक वाहनाने सत्रासेन गावाच्या हद्दीत उमर्टी शनिवारी १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी रवाना झाले. दरम्यान सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास उमर्टी गावातील अनेर नदीच्या खोलाच्या अलीकडे संशयित आरोपी पप्पीसिंग उर्फ नरेंद्रसिंग प्रीतम सिंग बर्नाला वय-३० रा.पार उमर्टी ता. वरला जि.बडवानी मध्यप्रदेश हातात गावठी पिस्तूल घेऊन उभा होता. दरम्यान त्याला पोलिसांचा सुगावा लागल्यानंतर तो हातातील गावठी कट्टा फेकून पळ काढला. त्यावेळी पोलीस नाईक शशिकांत पारधी आणि पो.कॉ. किरण पारधी आणि होमगार्ड विश्वास भिल यांनी पाठलाग करून संशयित आरोपी पप्पीसिंग बर्नाला याला पकडून ताब्यात घेतले. तसेच स.पो.नि. शेषराव नितनवरे यांनी त्याची अंगझडची घेतली असता त्याच्याकडून अजूल एक गावठी कट्टा ताब्यात घेतला. तसेच त्याने फेकून दिलेला गावठी कट्टा देखील पोलीसांनी ताब्यात घेतला.

दरम्यान सपोनि शशिकांत नितनवरे यांनी होमगार्ड रोशन बाविस्कर यांना उमर्टी गावाहून दोन पंच घेऊन येण्यास सांगितले, तेव्हा आरोपी पप्पीसिंग बर्नाला याने आरडाओरड केल्याने गावातील लोकांना माहिती समजली. त्यावेळी पो.ना. शशिकांत पारधी यांच्या दिशेने धावत आले तसेच उमर्टी गावातील गावठी कट्टे विकणारे व्यक्ति देखील येऊन जमाव निर्माण केला. यावेळी अटक केलेल्या पप्पीसिंग बर्नाला यांचा भाऊ राजेंद्रसिंग प्रीतमसिंग बर्नाला, सुरेंद्रसिंग प्रीतमसिंग बर्नाला तसेच गावातील सुखदेवसिंग लिव्हरसिंग बडोल, बादलसिंग उर्फ धरमसिंग दिलदारसिंग बर्नाला यांनी येऊन धमकी दिली. “तुम मेरे भाई को क्यो पकडा है उसे छोड दो” असे म्हणू लागले. त्यानंतर त्याला सोडवण्याचा प्रयत्न करत असताना पो.ना. शशिकांत पारधी आणि सोबत असलेले अंमलदार यांना मारहाण करू लागले. त्यावेळी पोलीस कॉन्स्टेबल किरण पारधी, होमगार्ड विश्वास भील यांना उमर्टी गावातील दोन जणांनी लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच जमलेले लोकांनीही छातीवर पोटावर लाभाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी जमावातील कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हवेत तीन ते चार वेळा गोळीबार केला. हे पाहून स.पो.नि शेषराव नितनवरे यांनी आत्मरक्षणासाठी त्यांच्या जवळील सर्विस रिव्हाल्वर मधून तीन राऊंड हवेत फायर केले. हे पाहून जमावाने यातील जखमी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत राहिले. त्यावेळी पकडलेल्या पप्पीसिंग या आरोपीला पोलीस कॉन्स्टेबल दीपक शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल चेतन महाजन, पोलीस कॉन्स्टेबल विशाल पाटील यांनी गाडीत घेऊन उमर्टी गावाकडे घेऊन गेले. यानंतर जामावातील काहींनी सपोनि शेषराव नितनवरे यांना जखमी करून बाजूच्या चारीत फेकून दिले. तर पोलीस नाईक शशिकांत पारधी यांना एका मोटरसायकलवर बसवून त्याचे त्यांचे अपहरण केले. आणि पार उमर्टी जंगलात अज्ञातस्थळी घेऊन गेले. त्याठिकाणी राजेंद्र सिंग प्रीतम सिंग बर्नाला याने धमकीत तू तुम्हारे पोलीस को फोन लगाके, हमारे आदमी को छोडने को बोल नही, तो हम तुम्हे मार डालेंगे अशी धमकी दिली आणि हातातील कट्ट्याने आजूबाजूच्या भागात फायर केले.

दरम्यान रात्री साडेनऊ वाजता मध्यप्रदेशातील वारला पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी यांनी शोध घेऊन अपहरण केलेल्या पोलीस नाईक शशिकांत पारधी यांची सुटका करण्यात आली. आणि त्यांच्या वाहनात बसवून उमर्टी येथील हद्दीत सोडले. दरम्यान ही घटना घडल्यानंतर जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे, पोलीस नाईक शशिकांत पारधी, पोलीस कॉन्स्टेबल किरण पारधी, होमगार्ड विश्वास भिल या चौघांना चोपडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दरम्यान या संदर्भात जखमी झालेले पोलीस नाईक शशिकांत पारधी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात संशयित आरोपी पप्पीसिंग उर्फ नरेंद्रसिंग प्रीतम सिंग बर्नाला वय-30, राजेंद्रसिंग प्रीतमसिंग बर्नाला, सुरेंद्रसिंग प्रीतमसिंग बर्नाला, गुरुदेवसिंग लिव्हरसिंग बडोल, बादलसिंग उर्फ धरमसिंग दिलदारसिंग बर्नाला आणि इतरांवर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पप्पीसिंग उर्फ नरेंद्रसिंग प्रीतमसिंग बर्नाला याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान उर्वरित प्रसार झालेल्यांचा शोध सुरू आहे.


Protected Content

Play sound