जळगाव प्रतिनिधी । लोकसभा निवडणूकीसाठी अर्ज सादर करण्याच्या सहाव्या दिवशी (2 एप्रिल) जळगाव लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून डॉ. सतिष भास्करराव पाटील यांनी तर हिंदुस्थान निर्माण दलाकडून संत श्री बाबा महाहंसजी महाराज पाटील यांनी जिल्हाधिकारी तथा जळगाव लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांचेकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात आजपर्यंत सहा उमेदवारांनी नऊ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघासाठी आज भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाकडून डॉ. उल्हास वासुदेव पाटील यांनी दोन उमेदवारी अर्ज सादर केल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली. आजपर्यंत रावेर लोकसभा मतदार संघात दोन उमेदवारांनी चार उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
जळगाव लोकसभा मतदार संघासाठी दोन तर रावेरसाठी एक उमेदवारी अर्ज
6 years ago
No Comments