Home Cities जळगाव १०० कोटींची जागा कवडीमोल भावात विक्री करण्याचा डाव-साबळे

१०० कोटींची जागा कवडीमोल भावात विक्री करण्याचा डाव-साबळे

0
30


जळगाव प्रतिनिधी । मोहाडी शिवारातील जवळपास १०० कोटी रूपये बाजारमूल्य असणारी जमीन कवडीमोल भावात विक्री करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते उल्हास साबळे यांनी केला आहे.

उल्हास साबळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मोहाडी शिवारातील गट नंबर ६० या जागेवर महापालिकेच्या महासभेत स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभारण्याचा ठराव केला आहे. या ठरावासाठी अशासकीय प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावावर कोणतीही माहिती, अभिप्राय, सूचना व हरकत दिलेली नाही. त्यामुळे बाजारभावानुसार १०० कोटींची जागा विक्रीचा डाव असल्याचा आरोप साबळे यांनी केला आहे. महापालिकेतील तत्कालीन व विद्यमान काही सदस्यांनी संगनमत करून हडप करण्यासाठी अशासकीय प्रस्ताव तयार केला असून, तो आर्थिक हिताविरुद्ध व जनहिताविरुद्ध असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी उल्हास साबळे यांनी केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound