बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र राज्याचे वरिष्ठ वकील उज्वल निकम यांची बदलापूर लैंगिक छळ प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेचा जलद गतीने तपास करून हे प्रकरण जलदगती न्यायालयात जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

उज्वल निकम यांनी या पूर्वी अनेक महत्वाचे खटले लढवले आहेत. त्यांनी आतापर्यंत ६२८ आरोपींना जन्मठेप आणि ३७ जणांना फाशीची शिक्षा देण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यानंतर आता उज्ज्वल निकम हे बदलापूर खटल्यात सरकारच्या वतीने बाजू मांडणार आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाने ट्विटरवर लिहिले की, बदलापूरमधील दुर्दैवी घटनेचा त्वरीत तपास केला जाईल आणि हे प्रकरण जलदगती न्यायालयात जाईल, असे एक्सवर पोस्टमध्ये म्हटले आहे.

Protected Content