Home धर्म-समाज राजकीय ड्रामेबाजीवर उज्ज्वल निकम यांचे मिश्कील भाष्य ! म्हणाले. . .

राजकीय ड्रामेबाजीवर उज्ज्वल निकम यांचे मिश्कील भाष्य ! म्हणाले. . .


अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर राज्याचे माजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अतिशय मिश्कील असे भाष्य करत पक्षांतर बंदी कायदा अजून सक्षम करण्याची आवश्यकता व्यक्त केली.

 

राज्यातील राजकीय नाट्य प्रत्येक क्षणाला नवनवीन वळण घेत आहेत. यावर ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी मिश्किल टिप्पणी केली आहे. ”सोयरीक एकाशी, लग्न दुसर्‍याशी, मंगळसूत्र तिसर्‍याचे आणि गर्भ चौथ्याचा !’ अशी सध्याच्या राजकारणाची स्थिती झाल्याचे उज्ज्वल निकम म्हणाले.

 

दरम्यान, निकम पुढे म्हणाले की, सध्याची राजकीय  परिस्थिती अक्षरशः वीट आणणारी आहे. पक्षांतरबंदी कायदा आणखी सक्षम करण्याची गरज आहे. सध्याच्या परिस्थितीत उपाध्यक्ष काय निर्णय देतात, यावर राजकीय कोंडीचे भविष्य आहे, असे उज्ज्वल  निकम यांनी सांगितले. ते अकोल्यात पत्रकारांशी बोलत होते.


Protected Content

Play sound