Home राजकीय भाजप खासदार उदीत राज काँग्रेसमध्ये दाखल

भाजप खासदार उदीत राज काँग्रेसमध्ये दाखल

0
30

नवी दिल्ली वृत्तसंस्था । तिकिट नाकारल्यामुळे नाराज असणारे भाजपचे विद्यमान खासदार उदीत राज यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

उदीत राज यांनी अलीकडच्या काळात भाजपच्या धोरणांवर अनेकदा टिका केली होती. यामुळे त्यांना पक्ष तिकिट देणार नसल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. यातच भाजपने उदीत राज यांच्या दिल्ली उत्तर-पश्‍चिम या मतदारसंघातून गायक हंसराज यांना तिकिट दिले. यामुळे संतप्त झालेल्या उदीत राज यांनी कालच पक्षत्याग करण्याचे संकेत दिले होते. यानंतर आज सकाळी त्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्या पक्षात प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. आपण दलीत असल्यामुळेच भाजपने अन्याय केल्याचा आरोप त्यांनी केला. आपण यापुढेदेखील दलीत समाजाच्या हिताचे मुद्दे उपस्थित करणार असल्याचे ते म्हणाले.

उदीत राज हे भाजपमधील मातब्बर दलीत नेते म्हणून गणले जात होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने भाजपला धक्का बसल्याचे मानले जात आहे


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound