धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गाडी क्रमांक ०९०५९/६० उधना-खुर्दा रोड (पूर्वीची सुरत-ब्रह्मपूर) साप्ताहिक एक्सप्रेसला धरणगाव येथे पुन्हा थांबा मिळाला आहे. खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांमुळे आणि खान्देश प्रवासी असोसिएशन, धरणगाव यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले आहे.
ही गाडी १२ मार्चपासून सुरू होणार असून, २ मे २०२५ पर्यंत धावणार आहे. ०९०५९ उधना-खुर्दा रोड एक्सप्रेस धरणगावहून नंदुरबार-सुरतकडे दर शनिवारी सकाळी १०.११वाजता सुटेल. (धरणगावहून थेट नंदुरबार-सुरत) तर ०९०६० उधना-खुर्दा रोड एक्सप्रेस धरणगाव-जळगाव-भुसावळ-अकोला-वर्धा-नागपूर-ब्रह्मपूर, खुर्दा रोडकडे दर बुधवारी संध्याकाळी ५.५७ मिनिटांनी सुटेल.
खान्देश प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष कमलेशदादा तिवारी, उपाध्यक्ष चंद्रकांत भावसार, सचिव श्रेयांस जैन, सहसचिव ॲड. नंदन पाटील, खजिनदार प्रतीक जैन, सदस्य युवराज रायपूरकर, दिनेश पाटील, प्रशांत भाटिया, नारायण महाजन, संभाजी सोनवणे आणि जतीन नगारिया यांनी जास्तीत जास्त प्रवाशांनी या गाडीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.