पाचोरा प्रतिनिधी । शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे १५ फेबु्रवारी रोजी पाचोरा येथे सभा घेणार असून येथूनच ते निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या हालचाली आता गतीमान होऊ लागल्या आहेत. युती होणार की नाही? हा सस्पेन्स अद्याप कायम असला तरी शिवसेनेने जय्यत तयारी सुरू केली आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार आर.ओ. पाटील यांचे नाव निश्चित मानले जात आहे. यामुळे युती न झाल्यास तेच शिवसेनेचे उमेदवार असतील हे निश्चीत मानले जात आहे. या पार्श्वभूमिवर, १५ फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे पाचोरा येथे येत आहेत. ते येथे सभा घेणार असून याच माध्यमातून ते निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, युतीबाबत माजी आमदार आर.ओ. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा निर्णय मातोश्रीवरूनच होणार असल्याचे स्पष्ट केले. तथापि, उध्दव ठाकरे हे पाचोरा येथे येणार असल्याच्या वृत्ताला त्यांनी दुजोरा दिला.