मुंबई प्रतिनिधी । महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. यामुळे आता राज्याचे पुढील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच असतील असे स्पष्ट झाले आहे.
आज सायंकाळी महाविकास आघाडीची प्रदीर्घ बैठक झाली. ही बैठक सुरू असतांना शरद पवार आधी बाहेर पडले. याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, अजून बैठक सुरू असून मुख्यमंत्र्यांच्या नावासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नावावर सर्वसंमती झाली आहे. यानंतर अनेक नेत्यांनीही उध्दव ठाकरे यांचे नाव समोर आल्याची माहिती दिली. यानंतर एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खासदार उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव स्वीकारल्याची माहिती दिली. यामुळे आता राज्याचे पुढील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असतील हे स्पष्ट झाले आहे.