मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आम्ही आधी गधाधारी होतो, मात्र अडीच वर्षांपूर्वी गाढवांना लाथा मारून हाकलले अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी आज देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. आजच्या बीकेसी येथील सभेत मुख्यमंत्र्यांनी भाजप, राज ठाकरे, राणा दाम्पत्य आदींवर जोरदार हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज मुंबईच्या बीकेसी मैदानावर जाहीर सभा झाली. या जाहीर सभेत त्यांनी संघ-भाजपसह मनसे, एमआयएम नेते अकबरुद्दीन औवेसी, तसेच राणा दाम्पत्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, संभाजीनगर येथे तो औवेसी गेला आणि औरंगजेबाच्या थडग्यावर डोकं ठेवून आला. हे यांचं जे काही चाललं आहे, यांची ए, बी, सी टीम, कुणाला औरंगजेबाच्या थडग्यावर पाठवायचं, कुणाच्या हातामध्ये भोंगा द्यायचा, कुणाच्या हातामध्ये हनुमान चालीसा द्यायची आणि मजा भगायची. काय कारवाई झाली तर त्यांच्यावर होणार आम्ही बोंबलायला वेगळे. आम्ही जाणार टोमॅटो सॉस लावून पत्रकार परिषद घेणार. हे तुमचं शौर्य. बरं सुरक्षा किती? झेड प्लस, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीका केली.
मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारवरही टिकेची झोड उठविली. ते म्हणाले की, पेट्रोलची सात पैशांनी दरवाढ झाली होती म्हणून वाजपेयी बैलगाडीतून संसदेत गेले होते. तो संवेदनशील भाजप पक्ष गेला कुठे? तुम्ही सांगता ही बाळासाहेबांची शिवसेना नाही. मग इथे कोण आहे? ही बाळासाहेबांची शिवसेना नसेल तर तुमचा भाजप तरी अटलजींची राहिला आहे का?, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
याप्रसंगी उध्दव ठाकरे यांनी हिंदुत्वावरूनही भाष्य केले. ते म्हणाले की, मला आज मोठी गदा दिली. मी मध्ये एकदा बोललो होतो. आमचं हिंदूत्व कसं आहे ते शिवसेनाप्रमुखांनी शिकवलं आहे. मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको तर अतिरेक्यांना बडवणारा हिंदू हवा आहे. तोच धागा घेऊन आपण पुढे जात आहोत. आमचं हिंदूत्व हे गदाधारी आणि बाकीच्यांचं हिदूत्व हे गदाधारी आहे. बसा बडवत. काय मिळालं? घंटा! हे बघा तो गदा हलवतोय अहो गदा पेलायला सुद्धा हातामध्ये ताकद पाहिजे. हनुमान, भीम! त्यामध्ये आपले देवेंद्र फडणवीस बोलले, अहो यांचं हिंदुत्व हे घंटाधारी नाही, गदाधारी आहे. म्हटलं बरोबर आहे. आमचं हिदुत्व हे गदाधारी होतं. पण ते अडीच वर्षांपूर्वी सोडलं. आमचे जे काही जुने फोटो तुमच्यासोबत येत आहेत त्याने तुमचा गैरसमज झाला असेल. आम्ही त्या गद्याला सोडून दिलं आहे. कारण त्याचा उपयोग नाही. शेवटी उपयोग काय त्याचा? गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता. त्यामुळे जी गाढवं घोड्याच्या आवेशात आमच्यासोबत होती त्या गाढवांनी लाथ मारण्याआधी आम्ही त्यांना लाथ मारुन बाहेर पडलो आहोत. आता बसा काय करायचंय ते, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
तसेच या सभेत त्यांनी राज ठाकरे यांचे हिंदुत्व बेगडी असून ते बाळासाहेब ठाकरे यांची कॉपी करत असल्याची टीका केली. तर काश्मिरातील पंडित भयभीत असून केंद्र सरकार याबाबत काहीही करत नसल्याची टीका केली.