मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्राचे राज्यपाल हे खूप दयाळू असल्याने आम्हाला सत्ता मिळण्यासाठी दोन दिवसांऐवजी सहा महिने मिळाल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मारला. सत्ता स्थापनेसाठी येत्या काही दिवसांमध्ये चर्चा करण्यात येईल अशी माहितीदेखील त्यांनी दिली.
अहमद पटेल आणि शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर उध्दव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली. यात त्यांनी राज्यपालांवर टीका केली. ते म्हणाले की, भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी दोन दिवस मिळतात. तर आम्हाला फक्त चोवीस तास देण्यात आले. आम्ही कालच राष्ट्रवादी व काँग्रेसशी संपर्क केल्याचे पवार आणि पटेल म्हणाल्याने या प्रकरणी भाजपचा कांगावा खोटा असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, राम मंदिरासाठी आम्ही कटीबध्द असल्याचे सांगण्यासही ते विसरले नाहीत.