पहूर, ता.जामनेर, प्रतिनिधी | आज सायंकाळी मुंबई येथील शिवतिर्थ मैदानावर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा शपथविधी सोहळा झाला. त्यानिमित्ताने पहूर येथे जल्लोष करण्यात आला.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन मित्र पक्षांना सोबत घेऊन महाविकास आघाडी स्थापन करून आज मुंबई येथील शिवतिर्थ मैदानावर मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे यांनी शपथ घेतली. त्याचा पहूर बसस्थानक परिसरात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी बॅन्डच्या तालावर ‘मी पुन्हा येणार ‘या गाण्यावर एकच जल्लोष केला. यावेळी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख अशोक जाधव, सुकलाल बारी, विकास आण्णा चौधरी, रविंद्र पांढरे, भावराव गोंधनखेडे, बंडू भिवसने, अशोक बाविस्कर, अमोल पाटील, अजय जाधव, राष्ट्रवादी काँग्रेसचे पहूरचे माजी सरपंच प्रदीप लोढा, ईश्वर बाबुजी जैन पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पाटील, रा.काॅ.युवक अध्यक्ष शैलेश पाटील, अरूण घोलप, किरण पाटील, तसेच काँग्रेसचे महात्मा फुले पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेक जाधव, ज्ञानदेव करवंदे, योगेश बनकर, हरिश्चंद्र जाधव, अशोक घोंगडे, विनोद क्षिरसागर, यांच्यासह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस चे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.