मुंबई (वृत्तसंस्था) अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुढील पाच वर्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असतील, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे.
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याची बातमी काही वेळापूर्वीच समोर आली. यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरलेले आहे. दुसरीकडे पत्रकारांशी संवाद साधतांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे पुढील पाच वर्ष मुख्यमंत्री असतील, असा दावा केला आहे. यानिमित्ताने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे शपथ घेतील हे स्पष्ट झाले आहेत.