नाशिक प्रतिनिधी । तलाठी भरतीच्या यादीबाबत निर्माण झालेला संभ्रम दुर करण्याची मागणी परिक्षार्थी उदय वायकोळे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.
या संदर्भात उदय वायकोळे यांनी नाशिकच्या जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी स्वत: २०१९ च्या तलाठी भरती परिक्षेचा परिक्षार्थी आहे. जळगाव, परभणी, बीड, रत्नागिरी आदींसह अन्य ठिकाणी या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रकाची पडताळणी करण्यात आली आहे. तर नाशिकला मात्र याबाबत काहीही माहिती दिली जात नाही. याबाबत प्रत्यक्ष विचारणा केली असता, उमेदवारांच्या गुणांची यादी अद्याप आली नसल्याचे कारण सांगितले जाते. या पार्श्वभूमिवर, अहमदनगर जिल्हाधिकार्यांनी महाआयटीकडून आलेली यादी वेबसाईटवर जाहीर करण्यात आली असून याच प्रमाणे नाशिकमधील यादीदेखील प्रसिध्द करण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. असे झाल्यास परिक्षार्थींमधील संभ्रम दूर होणार असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे.