जळगाव प्रतिनिधी । भरधाव जात असताना अचानक स्टेअरींग फिरल्यामुळे रेल्वे पुलाच्या बांधकामासाठी केलेल्या खड्डयात ट्रॅक्टर कोसळून चालकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी मोहाडी पोलीस पाटील यांच्या तक्रारीवरून मयत चालक विनोद मालचे व ट्रॅक्टर मालक देविदास सोनवणे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पाचोरा अप रेल्वेलाईनजवळ तिसर्या रेल्वे रुळाचे काम सुरु आहे. याठिकाणी एक मोरी जळील नवीन पूलाचे काम सुरु आहे. त्याठिकाणी कॉलम खोदून बीमचे काम सुरु आहे. या खड्डयाजवळ एक कच्चा रस्ता जातो. या रस्त्यावरुन चालक विनोद महारु मालचे हे त्यांच्या ताब्यातील एम.एच 19 ए.पी.8722 हे ट्रॅक्टर व ट्रॉली एम.एच.19 ए.एन. 9716 घेवून मोहाडी गावाकडे येत होते. पूलाचे काम सुरु असलेल्या खड्डयाजवळ अचानक स्टेअरींग फिरल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीसह खड्डयात पडले. यात ट्रॅक्टरखाली दाबल्या जावून विनोद मालचे यांचा मृत्यू झाला. माहिती मिळाल्यानंतर पोलीस पाटील शरद महारु सोनवणे तसेच मयत विनोद याचा भाऊ उखा मालचे, विनोद सोनवणे, तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने ट्रॅक्टर बाजूला विनोद मालचे यास बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
विनोद मालचे याच्यासोबत ट्रॅक्टरमध्ये असलेल्या ट्रॅक्टरचे मालक देविदास महाजन यांच्या चिथावणीवरुन अवैध वाळू भरलेले ट्रॅक्टर विनोद मालचे भरधाव घेवून मोहाडीकडे येत. यादरम्यान ही घटना घडली. ट्रॅक्टरच्या नुकसानीस तसेच स्वतःच्या मरहाण विनोद मालचे कारणीभतू असल्याचे फिर्यादीत पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे. त्यानुसार विनोद मालचे तसेच ट्रॅक्टर मालक देविदास पुंडलिक सोनवणे यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विशाल सोनवणे, सचिन मुंडे करीत आहेत.