मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्य सरकारने आज विश्वासमत प्राप्त केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आभार प्रदर्शनात बोलतांना अनेक आमदारांनी सभागृहाचा बाहेर राहून सरकारला मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यामुळे विरोधकांमधील फुटीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
शिंदे सरकारने आज विधानसभेत विश्वासमत ठराव सहजपणे जिंकला. ठरावाच्या बाजूने १६४ तर विरोधात फक्त ९९ मते मिळाली. खरं तर, काल विधानसभाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधकांना १०७ मते मिळाली असतांना आज फक्त ९९ मते मिळाल्याने विरोधकांमध्ये फूट पडल्याचे दिसून आली. सत्ताधार्यांचे आठ आमदार गैरहजर राहिल्याने ही बाब शक्य झाली. यावरूनच देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधार्यांना टोला मारला.
विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावर आभार व्यक्त करतांना फडणवीस यांनी शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तारूढ झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी काही सदस्यांनी बाहेर राहून आपल्याला सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या आजवरच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीचा आढावा प्रस्तुत करून त्यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुढे मार्गक्रमण करेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.