Home Cities भुसावळ तापी नदीपात्रात पाडळसे येथील दोघे तरूण बुडाले ( व्हिडीओ )

तापी नदीपात्रात पाडळसे येथील दोघे तरूण बुडाले ( व्हिडीओ )

0
29
mayat tarun

mayat tarun

भुसावळ प्रतिनिधी । यावल तालुक्यातील पाडळसे येथील दोघा तरूणांचा तापी नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना आज घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तापी नदीला सध्या मोठ्या प्रमाणात पाणी आलेले आहे. यामुळे पाडळसे येथील काही तरूण पोहण्यासाठी आले होते. यातील जयेश नारायण झोपे (वय २०) आणि प्रेम चंद्रशेखर चौधरी (वय१९) हे पाण्यात बुडाले. त्यांना वाचवण्याचा त्यांच्या मित्रांनी प्रयत्न केला. मात्र यात यश आले नाही. दरम्यान, वाचवणार्‍या एका मित्राच्या शरिरात पाणी गेल्याने त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, दोन्ही तरूणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांना शवविच्छेदनासाठी भुसावळच्या नगरपालिका रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार हरीभाऊ जावळे यांनी रूग्णालय गाठले. त्यांच्यासोबत उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड, शहर पोलीस स्थानकाचे पीआय बाळासाहेब ठुबे आदींची उपस्थिती होती.


Protected Content

Play sound