मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतल्या वडाळा अँटॉप हिल भागात चाळीची भिंत कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होते आहे. मुंबईतल्या अँटॉप हिल भागातल्या विजय नगर येथील पंजा गल्लीतील ही घटना आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर भिंत कोसळून ही घटना घडली आहे.
चाळीची भिंत कोसळून शोभादेवी मौर्य आणि झाकिरुन्निसा शेख अशी या दोन मृत महिलांची नावं आहेत. या दोन महिलांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, आज रात्री ९.३० च्या सुमारास ही घटना घडली. चाळीचा काही भाग कोसळला. वडाळा अँटॉप हिलच्या विजय नगरमधील पंजा गल्ली परिसरात ही घटना घडली. चाळीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील आणि वरच्या तीन मजल्यांवरील भिंतीचा काही भाग कोसळला होता आणि काही भाग लटकलेल्या स्थितीत होता अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दुर्घटनेत दोन महिला जखमी झाल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, या जखमींना रुग्णालयात मृत घोषित करण्यात आलं.