जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मौजमस्ती करणार्या पवन प्रेमचंद पाटील (कुंवर) वय-२६ रा. आव्हाणी ता. धरणगाव या सराईत दुचाकी चोरट्याच्या शहर पोलिसांनी कोर्टचौकातून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरी केलेल्या ११ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
शहरात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने पोलीस अधीक्षकांनी दुचाकी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना पोलीसांना दिल्या आहे. त्यानुसार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी गुन्हे शोध पथकाला दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गेल्या महिनाभरापासून गुन्हे शोध पथकातील कर्मचारी दुचाकी चोरट्याच्या मागावर होते. दि. १२ रोजी पवन हा कोर्ट चौकात दुचाकी चोरण्यासाठी आला असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली. त्यांनी कोर्ट चौकातून दुचाकी लांबविणार्या पवनला रंहेहाथ अटक केली होती. चोरट्याने नाशिक येथून २, सुरत येथून २ यासह जळगाव शहरातून ७ असा एकूण चोरीच्या ११ दुचाकी काढून दिल्या.
ही कामगिरी पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ विजय निकुंभ, भास्कर ठाकरे, पोना प्रफुल्ल धांडे, राजकुमार चव्हाण, पोकॉ रतन गिते, तेजस मराठे, योगेश इंधाटे यांच्या पथकाने केली.