Home Cities भुसावळ भुसावळात शिवजयंतीनिमित्त टू-व्हीलर रॅली

भुसावळात शिवजयंतीनिमित्त टू-व्हीलर रॅली


 

भुसावळ (प्रतिनिधी) येथील शंभुराजे ग्रुपतर्फे येत्या शनिवारी (दि.२३) शिवजयंती उत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे, भुसावळ येथील आमदार संजय सावकारे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, उपनगराध्यक्ष लक्ष्मीताई मकासरे व प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात सकाळी ९.०० वाजता ‘टू व्हीलर रॅली’ काढण्यात येणार असून तिला रिंग रोड वरील गडकरी नगरातील शंभूराजे चौकातून प्रारंभ होईल. या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शंभूराजे ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound