Home क्राईम पाळधी येथे घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी लांबविली

पाळधी येथे घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी लांबविली

0
27

धरणगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी खुर्द येथून एकाची ३० हजार रुपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची उघड करण्यात आले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धरणगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदा बाळू पाटील (वय-३०) रा. एमआयडीसी जळगाव, ह.मु. पाळधी खुर्द ता. धरणगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. दरम्यान २४ फेब्रुवारी रोजी रात्री  १० ते २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ दरम्यान त्यांनी त्यांची दुचाकी (एमएच १९ सीएम ८२६६) ही घरासमोर पार्क करून लावली होती. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेले, यासंदर्भात गोविंदा पाटील यांनी परिसरात शोधाशोध केली असता दुचाकी कुठेही मिळून आले नाही, अखेर त्यांनी यासंदर्भात पाळधी दूरक्षेत्र पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अरुण निकम करीत आहे.


Protected Content

Play sound