टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने दुचाकी लंपास

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने दुचाकी लंपास केल्याची घटना जळगाव शहरातील वाघनगर परिसरात घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील विवेकानंदनगर भागात अक्षय रमेश  मोरे वय 22 हा तरुण वास्तव्यास आहे. त्याला त्याची एम.एच.१९ डी.एल.४५९८ या क्रमाकांची दुचाकी विक्री करायची असल्याने अक्षय याने याबाबत ओलएक्स या ऑनलाईन वेबसाईटवर दुचाकीबाबतची माहिती दिली. १७ मे रोजी ओएलक्सवरील माहितीनुसार कुणाल राजपूत नामक एक तरुण रिक्षाने शहरातील वाघनगर परिसरात आला. दुचाकी खरेदी करायची असल्याने सांगत त्याने दुचाकीमालक अक्षय यास संपर्क साधला व जी दुचाकी विक्री करायची आहे, ती घेवून वाघनगर परिसरात यावयास त्याने सांगितले. अक्षय त्याची दुचाकी घेवून वाघनगरात पोहचला. दुचाकी खरेदी करायला आलेला कुणाल याने दुचाकी चालवून बघायची असे सांगितले. त्याच्यासोबत अक्षय हा सुध्दा मागे बसून गेला. त्यानंतर कुणाल याने पुन्हा दुचाकीचा स्पीड चेक करायचा असल्याचा बहाणा केला. व एकटाच दुचाकी घेवून गेला. व पुन्हा परत आलाच नाही. दोन दिवस उलटूनही तरुण दुचाकी घेवून परत न आल्याने अक्षय याने गुरुवारी तक्रारीसाठी रामानंदनगर पोलीस ठाणे गाठले. तक्रारीवरुन ४० हजार रुपयांची दुचाकी घेवून तिचे पैसे न देता फसवणूक केल्याप्रकरणी कुणाल राजपूत व एक अज्ञात तरुण अशा दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुनील पाटील हे करीत आहेत.

 

Protected Content