भरदिवसा दाणाबाजारातून दुचाकी लंपास : गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी ।  शहरातील दाणाबाजारातून भरदिवसा दुचाकी लंपास केल्याची घटना आज दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, श्रीकांत श्रीनिवास बांगड (वय-४९) रा. इंद्रप्रस्थ नगर यांचे शहरातील दाणाबाजार परिसरात साई प्लाझा येथे शुभलक्ष्मी शुभलक्ष्मी मार्केटिंग नावाचे दुकान आहे. २३ रोजी दुपारी दुपारी २ वाजता एमएच १९ सीके ४३५१ क्रमांकाची दुचाकी त्यांच्या दुकानातील कर्मचारी सुनिल पगारे हा जेवणासाठी घेवून गेला. जेवण करुन आल्यानंतर सुनिलने दुचाकी खाली अंगणात लावलेली असल्याचे सांगितले. काही वेळानंतर श्रीकांत बांगड हे कामानिमित्त गाडीजवळ आले. परंतु सुनिलने लावलेल्या ठिकाणी त्यांना गाडी मिळून आली नाही. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला मात्र तरी देखील त्यांना मिळून न आल्याने दुचाकी चोरी झाल्याची खात्री झाली. श्रीकांत बांगड यांनी तात्काळ शहर पोलीसात धाव घेतली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

 

Protected Content