सावदा ता. रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मस्कावद येथील तरूणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना रात्री ११ वाजता घडली. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत माहिती अशी की, तुषार पांडूरंग इंगळे रा. मस्कावद ता. रावेर हा तरूण आई, पत्नी आणि मुलगासह वास्तव्याला आहे. फोटोग्राफीचे काम करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. तुषार इंगळे हा १७ जानेवारी रोजी सायंकाळी सावदा येथे मित्र विशाल वानखेडे यांच्यासोबत दुचाकीने आला होता. रात्री ११ वाजेच्या सुमारास तुषार हा मित्र विशाल यांच्यासोबत दुचाकीने सावदा येथून मस्कावद येथे दुचाकीने घरी परतत असतांना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात तुषार हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ नेण्यात असतांना रस्त्यात त्याचा दुदैवी मृत्यू झाला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. जिल्हापेठ पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शुन्य क्रमाकाने सावदा पोलीसांनी नोंद वर्ग करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत होता.
एक महिन्यापुर्वीच तुषारचे वडिलांचे निधन झाले होते. त्यात आता तुषारचा अपघातात मृत्यू झाल्याने आणि घरातील एकुलता एक कर्ता पुरूष असल्याने इंगळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तुषारच्या पश्चात आई लताबाई, पत्नी, मुलगा देवांश असा परिवार आहे.