शिव कॉलनीतून दुचाकी गायब

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शिव कॉलनी परिसरातून चोरट्यांनी दुचाकी लांबविल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

सचिन दत्तात्रय चौधरी यांनी सोमवार, ९ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्यांची एम.एच.१९ डी.एम. ९३९३ या क्रमाकांची दुचाकी शिवकॉलनी परिसरातील अक्षय वधू वर केंद्राजवळ उभी केली होती. दुसऱ्या दिवशी दुचाकी दिसून आली नाही. सर्व शोध घेवूनही दुचाकी मिळून न आल्याने सचिन चौधरी यांनी मंगळवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण जगदाळे हे करीत आहेत.

 

Protected Content