जळगाव प्रतिनिधी । महार्गावर पाईप टाकण्यासाठी मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. सायंकाळच्या सुमारास दुचाकीस्वाराला हा खड्डा न दिसल्याने तो दुचाकीसह थेट २० फुट खोल खड्डात पडून गंभीर जखमी झाल्याची गणपती हॉस्पीटलजवळ घटना घडली. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
शहरातून गेलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. गणपती हॉस्पीटलजवळ सांडपाण्याचे ड्रेनेज काढण्यासाठी पाईप लाईन टाकली जात आहे. यासाठी महामार्गावर सुमारे २० फुट खोल खड्डा सोदण्यात आला आहे. आज गुरुवारी सायंकाळी 7 वाजता दीपक दत्तू चौधरी रा. फुकनगरी हा आरओ सव्हिसिंगचे काम करतो.
तो ग्राहकाकडे जाण्यासाठी आपल्या दुचाकीने आकाशवाणी चौकाकडून प्रभात चौकाकडे जात होते. महामार्गाच्या चौपदीकरणाच्याठिकाणी खड्डा खोदून त्याठिकाणी माती टाकली आहे. दीपक चौधरी यांना महामार्गावरील अंधारामुळे समोर असलेला खड्डा दिसला नाही. ते दुचाकीसह थेट खड्ड्यात पडल्याने त्यांच्या डोक, छातीसह उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. दीपक चौधरी हे दुचाकीसह खड्ड्यात पडल्याचे महामार्गावरील काही नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी दीपक यांना बाहेर काढीत खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दीपक चौधरी यांनी कामासाठी दोन दिवसांपुर्वीच नवीन दुचाकी घेतली होती. महामार्गावर पथदिवे नसल्यामुळे त्यांना खड्डा दिसला नाही त्यामुळे हा अपघात झाला. दीपक हे दुचाकीच्या खाली अडकले नाही अन्यथा गंभीर घटना घडली असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात होती.