जळगाव प्रतिनिधी । मित्रांसोबत सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या तरूणाची दुचाकी पार्किंग झोनमधून चोरीस गेल्याची घटना घडली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरोधात शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत रमेश पाटील (वय-26) रा. मळीपेठ, आसोदा, जळगाव हा मित्र जयंत सावकारे यांच्यासोबर खान्देश मिलमधील सिनेमागृहात दुपारी 12 वाजता सिनेमा पाहण्यासाठी दुचाकी क्रमांक एमएच 19 बीसी 9127 पार्किंग करून गेला होता. 2.40 वाजता सिनेमा संपल्यानंतर परत आल्यानंतर दुचाकी जागेवर मिळून आली नाही. त्यानंतर दुचाकीची शोधाशोध सुरू केला. रात्री उशीरापर्यंत दुचाकी मिळून आली नाही. याबाबत आज पहाटे शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात दुचाकी चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपासा पोलीस कर्मचारी गणेश पाटील करीत आहे.