अवैधपणे गुरांची वाहतूक करणारे दोन वाहने पकडले; अडावद पोलीसांची कारवाई

चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील अडावद येथील बसस्थानकाजवळून अवैधपणे गुरांची निर्दयपणे वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांवर अडावद पोलीसांनी कारवाई केली आहे. यामध्ये सात गुरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी अडावद पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांना ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, चोपडा तालुक्यातील अडावद बसस्थानकाजवळून अवैधपणे गुरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती अडावद पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद वाघ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने रविवारी २० ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता अडावद बसस्थानकाजवळ पोलिसांनी कारवाई केली. यावेळी वाहन क्रमांक (एमएच २१ जीसी ९१४६) आणि (एमएच २० बीएच ७५६४) या दोन वाहनांवर कारवाई करत त्या वाहनातून सात गुरांची सुटका करण्यात आली. यावेळी पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रोहित सुखदेव गवते वय-२३, समाधान अण्णासाहेब सोनवणे वय-२४, आकाश आनंदा भिरारे वय-२५ आणि विशाल सिद्धार्थ भिरारे वय-१९ सर्व रा. सिल्लोड जि. छत्रपती संभाजीनगर यांच्या विरोधात अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून पुढील चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.

Protected Content