अवैधपणे गुरांची वाहतूक करणारे दोन वाहन पकडले

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | हिंगोली गावाजवळून आयशर ट्रक मधून बेकायदेशीररित्या आणि निर्दीपणे गुरांची वाहतूक करणारे २ ट्रकवर चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी ल कारवाई केली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील हिंगोली गावाजवळून आयशर ट्रक क्रमांक (एमपी १२ एच ६३२) आणि (एमपी १२ एच २७९३) या ट्रक मधून गुरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी ३१ मे रोजी पहाटे ५.३० वाजता कारवाई केली. त्यावेळी दोन्ही वाहने अडवून यामध्ये निर्दयपणे कोंबून गुरांची वाहतूक होत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकाने पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अजमखान समशेर खान वय-३८, रा. खंडवा, जावेद खान मुबारक खान पठाण वय-३२, शेख तसलीम शेख रफिक वय-२८, शेख नासिर शेख शब्बीर वय-४२ आणि बिलाल शेख नासीर शेख वय-२२ सर्व रा. खंडवा मध्यप्रदेश यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content