Home क्राईम जामनेरात दोन दुचाकी लंपास, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

जामनेरात दोन दुचाकी लंपास, चोरटे सीसीटीव्हीमध्ये कैद

0
188


जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, आता शहरातील साईनाथ नगर भागात चोरट्यांनी एकाच रात्री दोन दुचाकी वाहने लंपास केल्याची घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे.

दिनांक २७ रोजी मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी हा गुन्हा केला. साईनाथ नगरमधील रहिवासी गोविंद इंदल चव्हाण यांच्या घरासमोरून त्यांची पल्सर (क्र. MH 19 EJ 4386) आणि नंदा भिका कोळी यांच्या घरासमोरून त्यांची एचएफ डीलक्स (क्र. MH 19 BK 8228) या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या.

चोरीनंतर दोन्ही दुचाकी मालकांनी तातडीने पोलिसात धाव घेतली. गोविंद इंदल चव्हाण आणि नंदा मधुकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी चार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, चोरी करतानाचे चोरट्यांचे फुटेज परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्या आधारे पोलीस तपास करत आहेत.

सध्या शहरातील अनेक भागांत दुचाकी व घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी रात्रीच्या वेळी शहराच्या मुख्य रस्त्यांसह गल्ल्यांमध्येही गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमुळे चोरट्यांचा लवकरच शोध लागेल अशी आशा आहे.


Protected Content

Play sound