साकेगाव, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथून जाणार्या राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या समांतर रस्त्यावरवर आज रात्री दोन मोटारसायकलींची जोरदार धडक झाल्याचे वृत्त आहे.
या संदर्भातील वृत्त असे की, साकेगाव येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळून पुढे जात मुख्य हायवेला जोडणार्या समांतर रस्त्यावर आज रात्री साडेआठच्या सुमारास भीषण अपघात घडला. यात दोन दुचाकींची समोरा-समोर जोरदार धडक झाली. या अपघातात एक मोटारसायकलस्वार आणि त्याच्या मागे बसलेली महिला ही जखमी झाली आहे. यातील महिलेची प्रकृती ही चिंताजनक असल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच परिसरातून ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात दाखल केले. तर तालुका पोलीस स्थानकाच्या निरिक्षकांसह सहकार्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्रे फिरवली. दरम्यान, या अपघातात दुचाकीला टक्कर मारणार्या दोघांनी घटनास्थळावरून पलायन केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून या संदर्भात तपास सुरू आहे. तर, जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.