जळगाव प्रतिनिधी । शहरातील ढाके कॉलनी येथून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, दिपक ईश्वर भावसार (वय-३०) रा. श्रीधर नगर जळगाव हा तरूण खासगी नोकरी करतो. कामावर जाण्यासाठी त्याच्याकडे (एमएच १९ सी ८५५९) क्रमांकाची दुचाकी आहे. १० मे रोजी कामाच्या निमित्ताने शहरातील ढाके कॉलनी येथे दुपारी १२ वाजता आला होता. ढाके कॉलनीतील शिव ऑर्केट कॉम्प्लेक्स समोर दुचाकी पार्किंगला लावली व कामानिमित्त निघून गेले. सायंकाळी ६ वाजता घरी जाण्यासाठी दुचाकी जवळ आले असता. त्यांची दुचाकी चोरी झाल्याचे उघडकीला आले. परिसरात शोध घेवून दुचाकी मिळाली नाही. दिपक भावसार यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील करीत आहे.