यावल प्रतिनिधी । तालुक्यातील गिरडगाव वाघोदा जवळ रस्त्यावर पायदळ चालणाऱ्या व्यक्तीला वाचविण्याच्या नादात दोन समोरासमोर झालेल्या ट्रकच्या अपघातात दोन चालकासह एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना दुपारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. जखमी झालेल्या तिघांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरकडून गुजरातकडे जाणारा लोखंडाने भरलेला ट्रक क्रमांक (एमएम 40 सीव्ही 4717) आणि हरीयाणाकडून चेन्नईकडे जाणारा ट्रक क्रमांक (यूके 04 सीए 9322) यांची यावल तालुक्यातील यावल-चोपडा रोडवरील गिरडगाव वाघोदा गावाजवळच्या दुहेरी पुलावर समोरासमोर झालेल्या अपघातात (यूके 04 सीए 9322) ट्रकवरील चालक मोहंमद अमर सलील (वय-22) आणि मोहम्मद नावाजीर (वय-24) रा. मेरठ, उत्तरप्रदेश तर दुसऱ्या ट्रकवरील मोहम्मद हमीद सईद मो. आरीफ (वय-45) रा. गरीब नवाज नगर, नागपूर या तिघे जखमी झाले. दरम्यान रस्त्यावर पायदळ चालणाऱ्या व्यक्तीला वाचविण्याच्या नादात हा अपघात झाल्याची माहिती जखमी ट्रकचालक मोहम्मद हमीद सईद मो. आरीफ यांनी लाईव्ह ट्रेंडन्यूजशी बोलतांना सांगितले.
परीसरातील नागरीकांची जखमींना मदत
दरम्यान हा अपघात झाल्यानंतर दोन्ही चालकासह तीघ्ज्ञे जण गंभीर जखमी झाले आहे. गंभीर जखमी झालेल्यांना जळगाव जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. अपघातासंदर्भात यावल पोलीसात कुठल्याही प्रकारची नोंद नसल्याचे कळाले आहे. हा अपघात झाल्या त्यावेळी परीसरातील नागरीकांनी धाव घेत अपघातात ट्रकच्या भागात अडकलेल्या जखमी चालकांना बाहेर काढण्याचे काम सुरू होते.