धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवळील गिरणा नदीपात्रातून अवैधपणे वाळूचा उपसा करणाऱ्या दोन वाहनांवर धरणगाव महसूल पथकाने कारवाई करत दोन ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी गुरुवारी १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावाजवळ गिरणा नदीपात्र आहे. या नदीपात्रातून वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत असल्याची गोपनीय माहिती धरणगाव येथील महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवारी १८ डिसेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता कारवाई केली. यावेळी महसूल पथकाने दोन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर जप्त केले आहे. याप्रकरणी ट्रॅक्टरचे मालक आणि चालक बाबू शेख आणि समाधान सोनवणे दोन्ही रा.बांभोरी ता. धरणगाव यांच्या विरोधात गुरुवारी १९ डिसेंबर रोजी मध्यरात्री १२.३० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार सुनील लोहार हे करीत आहे.