अमळनेर प्रतिनिधी । जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यवसायिक विकास संस्थेच्या वतीने आयोजित शिक्षणाची वारी या कार्यक्रमात तालुक्यातील डी.ए. धनगर व के.पी. सनेर या उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात शिक्षणाची वारी हा अभिनव कार्यक्रम सुरू आहे जळगाव धुळे नंदुरबार नगर बुलढाणा नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील शिक्षक मोठ्या प्रमाणावर सहभागी आहेत. प्रत्येक जिल्ह्यातून अनेक उपक्रमशील शिक्षक मुख्याध्यापक यांनी या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण वारी येथे भेट देऊन शाळेत गुणवत्ता वाढीसाठी चांगला फायदा होणार आहे या वारीत अमळनेर तालुक्यातील दोन उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे.
यात सानेगुरुजी हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक डी. ए. धनगर यांना शिक्षणक्षेत्रात गणित विषयात उत्कृष्ट कार्याबद्दल तर डीआर कन्या शाळेचे के. पी .सनेर सर यांना विज्ञानविषयात उत्कृष्ट कार्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविर्यात आले. शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉक्टर गजानन पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी देविदास महाजन ,अधिव्याख्याता डॉक्टर राजेंद्र महाजन ,प्राध्यापक शैलेश पाटील, डॉक्टर मंजुषा शिरसागर ,डॉक्टर मंगेश घोगरे ,प्राध्यापक अरुण भांगरे, प्राध्यापक सुचिता पाटील , प्राध्यापक प्रदीप पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचा सन्मान व सत्कार केला.
अमळनेर तालुक्यातील उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान तालुक्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे असे अमळनेर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी आर.डी महाजन यांनी सांगितले. शिक्षणविस्ताराधिकारी पी.डी.धनगर, बी.पी.चौधरी,नुतन सानेगुरूजी शाळेचे मुख्याध्यापक एस .डी .देशमुख ,कन्या स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे ,साने गुरुजी नुतन माध्य विद्यालय परिवाराच्या वतीने व मित्रपरीवारांने या दोन्ही मान्यवरांचे अभिनंदन केले आहे.