जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा आणि चोपडा शहरात घरफोडी करून उर्वरित दोन जणांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरत येथून अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाने शुक्रवार ८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यातील सावदा आणि चोपडा शहर येथे घरफोडी बाबत दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातील मुख्य आरोपी अक्षय संजय कोळी वय-२१ रा.अडावद ता.चोपडा याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवार ६ मार्च रोजी अडावद गावातून अटक केली होती. त्याची चौकशी केली असता त्याने दोन साथिदारांच्या मदतीने ही चोरी केल्याची कबुली दिली. यात शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी रा. हातेड ता.चोपडा आणि सचिन उर्फ भैय्या रामदास देवरे रा. सुरत अशी दोन नावे निष्पन्न झाले. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, कमलाकर बागुल, गोरखनाथ बागुल, महेश सोमवंशी असे पथक सुरतला रवाना झाले. पथकाने कारवाई करत संशयित आरोपी शांताराम कोळी आणि सचिन देवरे या दोघांना गुरुवार ७ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता ताब्यात घेतले. दोघांना पुढील कारवाईसाठी सावदा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस मुख्यालयातील जनसंपर्क विभागाच्या वतीने शुक्रवारी ८ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार द्वारे कळविले आहे