Home क्राईम चोरीच्या दोन दुचाकींसह दोन संशयितांना अटक

चोरीच्या दोन दुचाकींसह दोन संशयितांना अटक

0
139


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चोरीच्या दोन दुचाकी घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना रामानंदनगर पोलिसांनी रायसोनी नगरातून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आले.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, रामानंदनगर पोलीस स्टेशनचे कर्मचारी हेड कॉन्स्टेबल जितेंद्र गुरुमक राठोड (वय ५० वर्ष), सहाय्यक फौजदार संजय सपकाळे, सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी, उमेश पवार हे गुरुवारी १८ जुलै रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास गस्त घालत होते. त्यावेळेला रायसोनी नगर येथे शुक्रवारी रात्री १ वाजेच्या सुमारास दोन संशयित इसम हे दोन दुचाकीवर संशयास्पदरित्या अंधाराचा फायदा घेवून फिरत असतांना मिळून आले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे नाव प्रेम संजय बडगुजर (वय २०, रा. अयोध्या नगर, जळगाव) व अविनाश दिनकर बागुल (वय २७, रा. नगरदेवळा ता. पाचोरा) असे सांगितले.

त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच संशयित प्रेम बडगुजर याच्याकडील पल्सर वाहन (एमएच १९ डीजी ८०५०) आणि संशयित अविनाश बागुल यांच्याकडील पल्सर वाहन (एमएच ०२ टीजी ४९४१) या दोन्ही वाहनबाबत विचारपूस केले असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. यातील एक दुचाकी रामानंदनगर हद्दीतील चोरीची असून दुसरी मुंबई येथील चोरीची आहे.


Protected Content

Play sound