Home क्राईम महिलेचे बंद घर फोडणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक

महिलेचे बंद घर फोडणाऱ्या दोन संशयित आरोपींना अटक


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । समता नगरात राहणाऱ्या महिलेच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून घरातील कपाटातील ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लांबवणाऱ्या प्रकाश श्रावण सुरवाडे (वय-१८) व दीपक सुभाष भांडारकर (वय-२१) दोन्ही रा. समतानगर दोन संशयित आरोपींना रविवारी ७ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता समता नगरातून रामानंद नगर पोलिसांनी अटक केली.

याबाबत अधिक माहिती अशी की, समता नगरमधील रहिवासी प्रतिभा चंद्रकांत बनसोडे (वय-४०) या शनिवारी ६ जानेवारी रोजी कामानिमित्त घर बंद करून बाहेर गेल्या होत्या. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले रोख ७१ हजार रुपये व १० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पट्ट्या असा एकूण ८१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. प्रतिभा बनसोडे या घरी आल्या, त्यावेळी चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या घरफोडीसंदर्भात प्रभारी अधिकारी विठ्ठल पाटील यांनी सूत्रे फिरविली व त्यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे पोलिस नाईक रेवानंद साळुंखे, पोकॉ रवींद्र चौधरी यांनी रविवारी ७ जानेवारी रोजी मध्यरात्री दीड वाजता समता नगरातून दोन्‍ही संशयित आरोपी प्रकाश सुरवाडे व दीपक भांडारकर यांना अटक केली. त्यांच्याकडून काही रक्कम हस्तगत केली असून उर्वरित मुद्देमालाविषयी तपास सुरू आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय सपकाळे करीत आहेत.


Protected Content

Play sound