Home क्राईम उ.प्र.तून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक

उ.प्र.तून दोन संशयित दहशतवाद्यांना अटक



सहारनपुर (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकानं शुक्रवारी सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथून जैश ए मोहम्मदच्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. देवबंद येथील एका वसतिगृहात ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. शाहनवाझ अहमद तेली आणि आकिब अशी या संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत.

शाहनवाझ जम्मू-काश्मीरच्या कुलगामचा आहे, तर आकिब हा पुलवामातील रहिवासी आहे. सूत्रांनुसार, ब्रेन वॉश करून ‘जैश’ या दहशतवादी संघटनेत भरती करता येतील, अशा तरुणांच्या शोधात हे दोघे उत्तर प्रदेशात आले होते. याआधीही ते अनेकदा देवबंद आणि राज्यातील इतर भागात आले होते. आकिब पहिल्यांदा जानेवारीत एटीएसच्या रडारवर आला होता. एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, या संशयितांच्या फोनमधून ‘जैश’ शी संबंधित व्हिडिओ आणि फोटो मिळाले आहेत. त्यांचा संबंध ‘जैश’ शी असू शकतो, असा एटीएसला संशय आहे. शाहनवाझच्या चौकशीनंतर महत्वाची माहिती समोर येऊ शकते. तसंच पुलवामा हल्लाप्रकरणी तपास करणाऱ्या संस्थांनाही त्याच्याकडून मिळालेल्या माहितीचा उपयोग होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound