जळगाव प्रतिनिधी । शहरपासून जवळ असलेल्या नशिराबाद गावाजवळील मुंजोबा मंदिराजवळ कार आणि दुचाकीच्या अपघात दोन जण जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. यात दोन जण जखमी झाले असून त्यांनी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत नशीराबाद पोलीसात उशीरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते.
अधिक माहिती अशी की, नशिराबाद गावाच्या पुढे मुंजोबा मंदिराजवळ भरधाव कार मारुती कार क्रमांक एम. एच .19 सी.यू.7525 हिने दुचाकी क्रमांक एम. एच 19 डी.एच. 1020 तिला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. नशिराबाद पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जखमी मध्ये तुषार मधुकर सोनवणे रा. पिंपरखेड ता.जामनेर याचा समावेश असून दुसऱ्याची माहिती उशिरापर्यंत कळू शकली नव्हती. तसेच कार चालकाची माहिती देखील कळाली नाही. पोलीस उशिरापर्यंत घटनास्थळी होते.याबाबत नशिराबाद पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.