विहीरीत पोहायला गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

नांदेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नांदेड जिल्ह्यात दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. लोहा तालुक्यातील बेटसांगवी येथील दोन तरुणांचा विहिरीत पोहायला गेल्यानंतर मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी १० वाजता घडली. बेटसांगवी येथील तरुण शेतकरी संतोष सखाराम वानखेडे आणि राजेश गणेशराव वानखेडे हे शेतामध्ये पेरणीचे काम आटोपून घराकडे परतत होते. यावेळी त्यांना उष्णतेमुळे विहिरीमध्ये पोहण्याची इच्छा झाली.

त्यामुळे दोघेही विहिरीवर जावून पोहायला उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. संतोष वानखेडे यांच्या पश्चात आई, वडील व दोन बहिण तर राजेश वानखेडेला आई-वडिलांसह एक भाऊ आहे. दोन्ही तरुणांची विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून बेटसांगवी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

Protected Content